आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची पूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते झाली. यावेळी महापूजेला मानाचा वारकरी होण्याचा मान बीड जिल्ह्यातील रुई तालुक्यामधील येथील शेतकरी दांपत्य मुरली भगवान नवले, (वय 52) आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले( वय 47) यांना मिळाला आहे. नवले दांपत्य सलग 20 वर्षे पंढरीची वारी करताहेत.